आंध्र प्रदेश धावलं महाराष्ट्राच्या मदतीला, "300" व्हेंटिलेटर्स देण्याची जगनमोहन रेड्डीं यांची घोषणा, नितीन गडकरींची यांनी मानले आभार
नागपूर: महाराष्ट्राला कोरोना विषाणू संसर्गाचा फटका बसला आहे. दुसऱ्या लाटेतही महाराष्ट्र कोरोनाशी लढतो आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्ससाठी महाराष्ट्र केंद्राकडं आर्जव करत आहे. महाराष्ट्राच्या संकटाच्या परिस्थिती आंध्र प्रदेश राज्य महाराष्ट्राच्या मदतीला धावला आहे. महाराष्ट्राला मदत करावी अशी विनंती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना केली होती. जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केली. (Andhra Pradesh CM Y. S. Jagan Mohan Reddy announces that they will send 300 Ventilators to Maharashtra after discussion with Nitin Gadkari )
नितीन गडकरींची जगनमोहन रेड्डी यांच्याशी चर्चा
नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीसंदर्भात आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्याचर्चेनंतर जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केल्याची माहिती नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
Comments
Post a Comment