किती दिवस शासनाने सांगायचे मास्क वापरा
किती दिवस शासनाने सांगायचे विनाकारण बाहेर फिरु नका
किती दिवस शासनाने सांगायचे कोरोना पॉझीटीव्ह व्यक्तीने कोव्हीड सेंटर मध्ये जावे,गावात फिरुन संक्रमण वाढवु नये
किती दिवस शासनाने सांगायचे गर्दी करु नका,लग्नसोहळे मोठ्या दिमाखात करु नका ,यात्रा जत्रा रद्द करा
किती दिवस शासनाने सांगायचे स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या
किती दिवस आशा सेविका ,अंगणवाडी सेविका ,आरोग्य कर्मचारी ,ग्रामपंचायत कर्मचारी यांनी जीव धोक्यात घालुन सर्वेक्षण करायचे
किती दिवस सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामसेवक,ग्रामपंचायत कर्मचारी,पोलीस पाटील यांनीच तुमचेवर लक्ष ठेवायचे,चांगले सांगायला गेले की तुम्हाला गावकरी मिञांना राग येतो मग का या सर्वांनी गावाला वाईट व्हायचे,त्यांना पण कुटुंब आहै ,वृध्द आई वडील आहेत,लहान मुल बाळ आहेत
किती दिवस शासनाने सांगायचे कोवीड लसीकरण सुरक्षित आहे ,४५ वर्षपुढील वयाचे १०० % नागरीकांनी का नाही घेतली मग लस?
किती दिवस पोलीसांनी तुम्हाला मारुनच समजावयाचे
किती दिवस जिल्हाधिकारी तहसीलदार,गटविकास अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी,पोलीस निरिक्षक यांनी अहोरात्र कोरोना योध्दा बनुन तुमची सेवा करायची
राज्यातली सर्व कार्यालये,विमानसेवा,रेल्वे
बससेवा बंद असताना ग्रामपंचायत कार्यालय,सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य,ग्रामसेवक,ग्रामपंचायत कर्मचारी यांनी तुमच्या सेवेसाठी पुर्णवेळ राबायचे
परदेशातील कोरोना देशात आला ,देशातील कोरोना राज्यात,राज्यातला कोरोना आपल्या जिल्हात आला ,जिल्हातुन तालुक्यात,तालुक्यातुन गावात,गावातुन आपले घरात आला
अरे मग किती दिवस तुम्हाला समजुन सांगायचे
जीवनावश्यक काहीच नाही
जीवन आवश्यक आहे
किती दिवस शासनाने सांगायचे आता तरी गंभीर व्हा,व्हेंटीलेटर चे बेड नाही,अॉक्सीजन नाही,रेमडीसीवर इंजेक्शन नाही
देवाच्या रुपात काम करत असलेले डॉक्टर,आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्या सहनशक्तीचा अंत पाहु नका
घरी रहा सुरक्षीत रहा
किती दिवस शासनानेच प्रत्येक गोष्ट सांगायची
देशाचे नागरीक म्हणुन आपली काहिच जबाबदारी नाही का
स्वतःची,कुटुंबाची ,वृध्द आई वडिलांची,लहान बालकांची खरच तुम्हाला काळजी वाटत नाही का?
मृत्युचे तांडव पाहीले ,कुटुंब पोरकी झाली तरी आपण गंभीर नाही
आता शेवटच सांगत आहै गावकरी बंधु भगीनी, मातांनो
स्वतःला आणी
सोन्यासारख्या गावाला जपा.
Comments
Post a Comment