आजचा दिवस ११ वा
एक सलाम खाकी वर्दीतल्या योध्याला
एक सलाम पांढऱ्या कोट मधील आरोग्य सांभाळणाऱ्या योद्यांना
एक सलाम त्या सफाई करणाऱ्या योध्यांना
पोलीस आयुक्त @hemant nagaralkar यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत फक्त मानवता हाच
धर्म म्हणुन संपूर्ण लातूर शहरातील पोलीस, महानगरपालिका कर्मचारी, सफाई कामगार
आरोग्य विभाग कर्मचारी (front line वॉरियर्स) यांना मित्रांच्या मदतीने चहा,
पाणी, लिंबू सरबत वाटपाचे कार्य गेली ११ दिवस सातत्याने सर्व नियम पाळून करत
आहोत....
त्यांच्या या आदर्श कार्याला, स्वतःचे प्राण अर्पण करण्याच्या त्यांच्या जिद्दीला
, जो ध्यास त्यांनी घेतला आहे.... त्यांच्या त्या आभाळ एवढ्या प्रचंड कार्यास
थोडासा आल्हाददायी वेळ मिळावा याकरिता आमचा एक खारुताईचा वाटा.
कोवीड योद्ध्यांचे सेवेकरी
(ही टीम नाहीये ,हा कोणता ग्रुप नाहीये) फक्त मानव धर्म म्हणून
Frontline warriors
(पहिल्या फळीतील योद्धे)
यांना
चहा , डिकाशन व लिंबू शरबत वाटपाचे कार्य गेली 11 दिवस सातत्याने सुरू ठेवले आहे.
संपूर्ण लातूर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पोलिस कर्मचारी , परिवहन विभाग
कर्मचारी ,महानगरपालिका कर्मचारी ,आरोग्य विभागाचे कर्मचारी नाकाबंदी अथवा दुयटी
साठी तैनात आहेत त्यांच्या ठिकाणी जाऊन सेवा देण्याचं कार्य पुढील काळात
सातत्याने सुरूच राहणार आहे....
संपूर्ण काळजी घेऊन मास्क, सनितिझर ,ग्लोव्हज व संपूर्ण काळजी घेऊनच हे कार्य
सुरू आहे......
(ही कोणतीही टीम नाही फक्त मित्र मित्र एकत्र येऊन स्वखर्चाने हे कार्य करीत
आहोत.)
सर्वांच्या सहकार्य साठी धन्यवाद
Comments
Post a Comment