दरवर्षी प्रति झाड 570 रुपये. बांधावरची वृक्षलागवड आणि स्वतःच्या खाजगी जागेवर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वृक्षलागवड करणे
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र शासन आणि राज्य शासन यांची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये पायाभूत आणि मूलभूत सुविधांचा विकास करणे तसेच ग्रामीण भागातील शेतकरी आणि भूमिहीन लाभार्थी यांना शाश्वत स्वरूपाचा रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना लखपती करण्याचे शासनाचे धोरण आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना लखपती करण्याच्या अनुषंगाने बांधावर वृक्ष लागवड व स्वतःच्या खाजगी जागेत वृक्षलागवड करणे हे एक अत्यंत महत्त्वाचे काम आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेताच्या बांधावर व स्वतःच्या खाजगी जागेत झाडे लावण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आराखड्यामध्ये आपले नाव समाविष्ट करणे गरजेचे आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आराखड्यात नाव समाविष्ट केल्यानंतर ग्रामपंचायत मासिक सभेच्या ठरावाने बांधावर व स्वतःच्या खाजगी जागेमध्ये वृक्ष लागवड करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या कामाची पंचायत समिती किंवा सामाजिक सामाजिक वनीकरण विभागाकडे एकत्रितपणे मागणी करते. ग्रामपंचायत ने पंचायत समितीकडे बांधावरच्या वृक्ष लागवड कामाची मागणी केल्यानंतर पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी संबंधित कामाचे अंदाजपत्रक तयार करतात. संबंधित कामाचे अंदाजपत्रक तयार केल्यानंतर पंचायत समितीचे कृषी अधिकारी संबंधित कामाला तांत्रिक मान्यता देतात. पंचायत समितीच्या कृषी अधिकारी यांनी तांत्रिक मान्यता दिल्यानंतर त्यांच्यात समितीचे गटविकास अधिकारी संबंधित कामाला प्रशासकीय मंजुरी देतात. विकास अधिकारी यांनी प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर संबंधित काम नरेगा सॉफ्टवेअर ऑनलाइन केले जाते. सदर काम ऑनलाईन झाल्यानंतर पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी संबंधित कामाचे जिओटॅग करतात. बांधावरील वृक्ष लागवड व स्वतःच्या खाजगी जागेत वृक्ष लागवड करण्याचे काम जिओ टेक केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याचे खड्डे खोदण्याचे मास्टर ग्राम रोजगार सेवक आखडून काढले जातात. खड्डे खोदल्यानंतर संबंधित शेतकरी स्वतः रोपे खरेदी करून वृक्ष लागवड करतात व सदर कामाचे कुशल देयक सादर केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात रोपांचे पैसे जमा होतात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत साधारणपणे 31 प्रकारची झाडे आपण बांधावर व खाजगी जागेत लावू शकतो या झाडांमध्ये आंबा चिंच सीताफळ आवळा साग बांबू चंदन मिलीया डुबिया , महोगणी, काजू यासारखे 31 झाडांचा समावेश होतो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत प्रति शंभर झाडांमागे 171 मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शासन पावणे तीन वर्षांमध्ये प्रति झाड साधारणपणे पाचशे सत्तर रुपये अकुशल व कुशल नदीच्या स्वरूपात शेतकऱ्याला देते. जागतिक तापमान वाढ व व हवामानातील बदल यामुळे पारंपारिक शेतीमध्ये अनेक प्रकारचा धोका संभवतो त्यामुळे बांधावरील वृक्ष लागवड व खाजगी जागेवरील वृक्षलागवड यामुळे शेतकऱ्यांना एक शाश्वत आणि अतिरिक्त स्वरूपाचे उत्पन्न प्राप्त होऊ शकते व या माध्यमातून पर्यावरणाचे संवर्धन करणे सुद्धा शक्य आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतात व बांधावर वृक्ष लागवड करून त्या माध्यमातून अतिरिक्त स्वरुपाचे उत्पन्न मिळवावे . सदर कामाची सुरुवात साधारणपणे मे महिन्यामध्ये होते मे महिन्यामध्ये झाडे लावण्यासाठी मजुरांचे मास्टर काढले जातात. जून ते ऑगस्ट महिन्यात वृक्ष लागवड करून पंचायत समितीत खरेदीचे देयके सादर करण्यात येतात व एक ऑगस्ट पासून रोपांचे संवर्धन करण्यासाठी मास्टर व कुशल देयके पंचायत समितीत सादर करता येतात.
Comments
Post a Comment