नान्नज गावं पाळणार पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन

नान्नज गावं पाळणार पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन

उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज गावात कोरोना चा शिरकाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय सरपंच ,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व व्यापारी आणि नागरिक या सर्वांच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आला. पुढील पाच दिवस संपूर्ण गावात जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे. हे पाच दिवस सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

नान्नज गावामध्ये आरोग्य उपकेंद्र व  सेंट लुक्स हॉस्पिटल आहे, तरी या हॉस्पिटलमध्ये ५० बेड ची सुविधा उपलब्ध केली आहे, त्यातील ४० बेड हे ऑक्सिजन बेड आहेत तसेच उर्वरित १० बेड हे आयसोलेशन बेड उपलब्ध आहेत. ग्रामस्थांना काही कोरोनाची संकेत आढळत असतील तर ताबडतोब कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक आहे. कोरोना वर वेळेत उपचार घेतले तर पूर्णपणे बरा होतो,त्याला घाबरण्याची काहीही गरज नाही. पण काही लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळील हॉस्पिटलमध्ये कोरोनाची चाचणी घेऊन त्यावर उपचार सुरू करावा.
वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे, मास्क वापरावे,सॅनिटायझर वापरावे.शासनाच्या नियमाचे पालन करावे व स्वतःला घरी सुरक्षित ठेवावे.


सौजन्य:- ग्रामपंचायत नान्नज, ता. उ. सोलापूर

Comments